Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांची बदली; रविंद्र बिनवडे नवीन अतिरिक्त आयुक्त

पुणे : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुंबईत बदली झाली आहे. अग्रवाल अग्रवाल यांच्याकडे एकात्मिक बाल विकस योजनेच्या आयुक्तपपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.तर महापालिकेतील रिक्त झालेल्या अतिरिक्त आयुक्तपदी जालन्याचे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अग्रवाल यांची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अग्रवाल यांची 1 जानेवारी 2019 ला नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, अवघ्या वर्षभराने शहरात उद्भवलेल्या करोनासंकटाच्या काळात शहरात आलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करोना नियंत्रणाची जबाबदारी उल्लेखनियरित्या त्यांनी सांभाळली. त्याची दखल राज्यशासनाने वेळेवेळी घेतली होती. करोना संकटात जंबो हॉस्पीटलची उभारणी, खासगी हॉस्पीटलचे बेड ताब्यात घेणे, महापालिका ऑक्‍सिजन निर्मितीत आत्मनिर्भर करणे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तर करोनासंकटाच्या काळात महापालिकेची उत्पन्नवाढ तसेच सीएसआर अंतर्गत महापालिकेसाठी निधी मिळविण्यात त्यांनी मोठी भूमिका निभावली तर काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पुढाकारातून शहरात तिसऱ्या लाटेचे संकट थोपविण्यासाठी देशातील पहिले लहान मुलांचे कोवीड रूग्नालय उभारण्यास, मुलांसाठी बेडच्या व्यवस्थापनाचे काम हाती घेण्यात आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading