fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

कोरोना – पुणे शहरात गेल्या चोवीस तासात 228 नवीन रुग्ण 334रुग्णांना डिस्चार्ज


पुणे : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशे  च्या आत आली आहे तर अक्टिव्ह रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात येत्या 24 तासात पुणे शहरामध्ये 228 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 344 रुग्ण बरी झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4  लाख 822 हजार 51 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 4लाख 70 हजार 720इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या चोवीस तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 11तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे आतापर्यंत पुणे शहरात 8663 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर   5840  स्वॅब   तपासण्या करण्यात आल्या आहेत.

शहरांमध्ये सध्या 2868 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत त्यापैकी 226रुग्ण गंभीर आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading