डॉ.नीलम गोऱ्हे यांची शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी घेतली सदिच्छा भेट

पुणे : शिवसेना नेत्या, प्रवक्त्या विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी सिल्व्हर रॉक्स, पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी मातोंडकर यांचा शाल, श्रीफळ व स्वयंलिखीत ‘समानतेकडून विकासाकडे’ पुस्तक देऊन डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते यथोचित सन्मान केला गेला. साधारणपणे दीड तासाच्या या भेटी मध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. या वेळी अनेक शिवसेना महिला आघाडी, पुणेच्या पदाधिकारी यांनी देखील भेट घेतली.

Leave a Reply

%d bloggers like this: