इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात काँग्रेसचे सायकल यात्राआंदोलन

पुणे:वकेंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाई विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १० वाजता अप्पर(बिबवेवाडी) ते मार्केटयाड पेट्रोल पंप येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभयजी छाजेड, मा.नगरसेवक विजयराव मोहिते- शैलेंद्र नलावडे, पर्वती विधानसभा NSUI अध्यक्ष केतन जाधव, पुणे शहर सरचिटणीस विश्वास दिघे, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, संजय(दादा) अभंग, द.स.पोळेकर, जयकुमार ठोंबरे, राजु शिंगे व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: