अभय छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्त घरेलू कामगार महिलांना मोफत अन्नधान्य किट वाटप
पुणे: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्त घरेलू कामगार महिलांना मोफत अन्नधान्य किट आदिनाथ सोसायटी येथे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन पर्वती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सुजित लाजुरकर व पर्वती विधानसभा विध्यार्थी काँग्रेस अध्यक्ष केतन जाधव यांनी केले. यावेळी द.स पोळेकर, विश्वास दिघे, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, सौरभ अमराळे, परवेज तांबोळी, अंकुश हरगुडे, भरत सुराणा, अप्पा पंडित, अक्षय सागर, हरेश यादव, पृथ्वीराज पवार, रोहित रोकडे व इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
