Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

‘थलायवा’ची राजकारणातून एक्जिट

चेन्नई : ‘थलायवा’ अर्थात सुपरस्टार रजनीकांत यांनी आज राजकारणात येणार नसल्याचे सांगत राजकारणातून एक्जिट घेतली आहे. ‘रजनी मक्कल मंदरम संघटना’ बरखास्त करत राजकारणच्या दिशेने सुरु केलेला प्रवास थांबवला आहे. संघटनेच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर रजनीकांत यांनी निर्णय जाहीर केला. भविष्यात राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही, असं देखील रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच रजनी मक्कल  मंदरम संघटना बरखास्त करुन ‘रजनीकांत रसीगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’ म्हणून काम करेल, असही  जाहीर केले.

दरम्यान, तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी डिसेंबर २०२० मध्ये रजनी मक्कल मंदरम संघटना सुरू केली होती. पुढे याच संघटनेचे पक्षात रूपांतर होऊन अम्माच्या नंतर हा पक्ष अण्णा द्रमुकला पाठिंबा देईल भाजप सोबत जाईल अशी चर्चा होती. पण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रजनीकांत यांनी यू टर्न घेतला आणि ते राजकारणात सामील होणार नसल्याचे  सांगितले. त्यानंतर रजनीकांत यांच्या संघटनेचे अनेक सदस्य द्रमुकसह अन्य पक्षात सामील झाले होते. तर आता ही संघटनाच गुंडाळण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading