‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’
सामाजिक कार्यकर्त्या प्रीती काळे यांना जाहीर

पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषेदेच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ उद्योजिका आणि जिओ फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षा प्रीती काळे यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती परिषेदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.

औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ९ ऑगस्ट २०२१ रोजी होणाऱ्या आठव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. प्रा. डॉ. माधवी खरात यांच्या अध्येक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. विशेषतः कोरोनाच्या भीषण काळात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल हा सन्मान असल्याचे संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: