बेरोजगार तरुणांना सरकारने नोकरी दिलीच पाहिजे – डॉ. बाबा आढाव

पुणे:  भगतसिंग राष्ट्रीय  रोजगार हमी कायदा बेरोजगार विद्यार्थ्यांना  मिळालाच पाहिजे   यासाठी अभ्यासिका विद्यार्थी समिती व विद्यार्थ्यांनी विविध मागण्यासाठी आज अलका चौकात आंदोलन केले.
रोजगाराच्या बाबतीत सरकारचा कोणते धोरण नसताना व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या स्वप्निल लोणकर आत्महतेच्या पार्श्वभूमीवर या देशात कोणतही भविष्य नसल्यास तरुणांच्या हाताला काम द्या अशी विद्यार्थ्यांची मागणी आंदोलनाच्या वेळी होती. अच्छे दिन  कोणाचे ?अंबानी, आडाणीचे बेरोजगारांना रोजगार  भक्ता मिळालाच पाहिजे, हाताला काम मिळालेच पाहिजे ,एकता जिंदाबाद अश्या घोषणा विद्यार्थ्यांकडून आंदोलनाच्या वेळी करण्यात आल्या.

या आंदोलनाच्या वेळी हमाल संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, आप पक्षाचे सुभाष वारे काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी अभ्यासिका विद्यार्थी समितीचे विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबा आढाव म्हणाले, सरकार तरुणाईचा अजिबात विचार करत नाही. सरकार मधील नेते आपल्याला पुढे कसे जाता येईल याचा फक्त विचार  करत आहे सरकारच्या अजेंडा हा फार वेगळा आहे भारताला स्वतःचे अति धोरण ठरवावे लागेल तरुणाईला काम मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे.  बेरोजगार तरुणांना राज्य सरकारने नोकरी दिलीच पाहिजे. तरुणाईला व्यवसायासाठी सरकारने पैसे दिले पाहिजे बेरोजगार तरुणांना नोकरी भेटण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने काहीतरी उपाय काढले पाहिजेत सरकारने दारिद्र्यसे खाली किती लोक जगत आहेत याचा विचार सरकारने केला पाहिजे माध्यमांनी पण सरकारला याबाबत विचारले पाहिजे.
स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याच्या मृत्यू नंतर अजितदादांनी रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला असे किती स्वप्नील लोणकर मेल्यानंतर सरकारला जाग येणार आहे मी बेरोजगार तरुणांच्या विद्यार्थी पाठीमागे मी उभा आहे . या सरकारला लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांना योग्य हमीभाव सरकार देत नाही रिक्षाचालकांकडे दुर्लक्ष करते  लोकसभेत
खासदारांनी रिक्षा चालक शेतकऱ्यांचे व बेरोजगार तरुणाईचे प्रश्न मांडले पाहिजेत सगळ्यांना न्याय दिला पाहिजे माझे वय हे 75च्या पुढे असू न ही मी आज बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी या आंदोलनात सहभाग घेतला.


मोदींच्या राज्यात संघटित व असंघटित क्षेत्रातील दोन कोटी नोकऱ्या नष्ट झाल्या आहेत गेल्यावरती रेल्वेच्या फक्त 90 हजार जागांसाठी तब्बल 2.5 कोटी अर्ज आले यूपीएससी परीक्षा देणाऱ्यांची आकरा दहा वर्षात 3लाखांवरून 10लाखांवर गेला आहे 2015 चाली उत्तर प्रदेशात 368 जागांसाठी पीएचडी इंजिनिअर धरून 23 लाख अर्ज गेले नोटबंदी आणि जी एस टी ने तर भारतातील लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या महाराष्ट्र सरकारने जवळपास 5 लाख सरकारी नोकऱ्या रद्द करण्याचे
नियोजन केले आहे लाखो लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन हे सरकार फक्त धुंगी सरकार कधी जातीवाचक कधी आरक्षणाचा धुरळा उडवत आहे


अभ्यासिका विद्यार्थी समिती व विद्यार्थ्यांच्या प्रमुख
मागण्या
1) काम रोजगार आणि सर्वांना समान व मोफत शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार राज्यघटनेत देण्यात यावा
2) भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा लागू करा गावच्या यांच्या स्तरावर वर्षभर रोजगाराची हमी दिल्यास कमीत कमी रुपये 10,000प्रती महिना निर्वाह भत्ता द्या
3) वेतनात कपात न करता कामाचे तास 6 करा
4) नेहमी स्वरूपाच्या कामांमध्ये एकतारी प्रथाच तात्काळ बंद करा सरकारी विभागांमध्ये नियमितपणे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लगेच कायम करा आणि अशा सर्व पदांवर कायमस्वरूपी भरती करा
5) केंद्र आणि राज्य स्तरावर लगेच आवश्यक त्या परीक्षा घेऊन सर्व रिकामी पद लगेच भरा
6) केंद्र व राज्य स्तरावर या पदांच्या परीक्षा झाल्या आहेत त्यातील उत्तीर्ण उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्या

Leave a Reply

%d bloggers like this: