आंबिल ओढा झोपडपट्टी कारवाईच्या स्थगितीला मुदतवाढ

पुणे: पुणे शहरातील सर्व झोपड्या पाडण्याची कारवाई स्थगित करावी या मागणीसाठी  पुणे महानगरपालिकेसमोर सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्व पक्षांतर्फे व आंबील ओढा येथील नागरिकांनी महापालिके समोर मोर्चा काढला सदर मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे व भारतीय दलित कोब्रा व इतर पक्ष संघटनेचे नेते या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते.

ऍड. भाई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आज आंबील ओढयावरील जी महानगरपालिकेने कारवाई केली होती त्या कारवाईला स्थगिती भेटावी म्हणून आज पुणे कोर्टात तारीख होती वकील किरण कदम हे केस लढवत आहेत आज झालेल्या सुनावणीमध्ये आंबील  ओढा झोपडपट्टी कारवाईच्या स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. 19 जुलैला  न्यायालयात  पुढील सुनावणी होणार आहे अशी माहिती ऍड. किरण कदम यांनी पत्रकारांना कोर्टातून बाहेर आल्यानंतर सांगितले.

भाई चव्हाण म्हणाले, आंबील ओढा येथील नागरिकांना न्याय भेटा यासाठी आज आम्ही महानगरपालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा काढला आंबील ओढा येथे जी महानगरपालिकेने कारवाई केली होती आंबील ओढा व पुणे शहरातील सर्व झोपड्पट्या पाडण्याचा जो महानगरपालिकेचा डाव आहे त्यासाठी मी व वकील किरण कदम पुणे न्यायालयात झोपत पुणे शहरातील झोपडपट्टया कारवाई स्थगित होव्यि यासाठी आज कोर्टात तारीख होती आज त्या  कारवाई ला  मुदतवाढ देण्यात आली आहे आम्हा सर्वपक्षीय नेत्यांचे एकच मत आहे आबील ओढा येथील ज्या नागरिकांची घरे पडली आहेत त्या नागरिकांची लवकरात लवकर घरे महानगरपालिकेने बांधून द्यावी यासाठी आज आम्ही आंदोलक पालिका आयुक्तांची भेट घेणार आहोत व त्यांना एक निवेदन देणार आहेत

Leave a Reply

%d bloggers like this: