Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यपाल महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल  – राजू शेट्टी

पुणे:आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय कामात असतात, त्यामुळे त्यांना विधानपरिषदेच्या नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल असा टोला शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपालांना लगावला राज्य सरकारने विधानपरिषदेवर नियुक्त करायच्या १२ ,सदस्यांची यादी दिली त्यात शेट्टी यांचे नाव असल्याची चर्चा आहे. मात्र अनेक महिने झाले तरी राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करायला तयार नाहीत. याविषयी विचारले असता शेट्टी यांनी राज्यपाल कामात आहेत, त्यामुळे त्यांना वेळ नाही असे सांगितले.

राजू शेट्टी यांनी रकमी एफ आर पी संदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची शिवाजी नगर येथील साखर संकुल येथे भेट घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला.
राजू शेट्टी यांनी भाजपावरही टीका केली. ज्यांनी जात काढली त्यांच्याबरोबर शेट्टी जातात या भाजपाच्या टिकेला प्रत्यूत्तर देताना ते म्हणाले, ‘सत्ता नसल्याने भाजपाचे सगळे नेते कासाविस झाले आहेत. त्यांनी कोणाकोणाची जात काढली ते राज्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये.’ असाही टोला त्यांनी भाजपला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट साखर ऊत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर झाली. साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार केला जातो, पण त्यासाठी ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षातही घेतल्या जात नाहीत. याविषयी पवार यांच्याबरोबर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनाही भेटून मागणी केली आहे.जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येथील पुढील काळात आंदोलन करण्यात असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
निती आयोगाने शेतकऱ्यांना ऊसाची किंमत तीन हप्त्यात द्यावी अशी शिफारस केली ती मान्य नाही. वेळ पडल्यास याविरोधात न्यायालयातही जाऊ. याविषयांसंदर्भात राजकीय पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहेत. यात राजकारणाचा काहीही संबध नाही.असे राजू शेट्टी म्हणाले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading