आंबील ओढा येथील 23 कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : आंबिल ओढयातल्या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर होणार असल्याचे विधानसभा उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ.गोऱ्हे यांनी आज महापालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांसोबत आंबिल ओढ्यची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या वेळी बोलत होत्या.
आंबिल ओढ्या मध्ये झालेल्या अतिक्रमण कारवाईला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. आक्रमक झालेल्या नागरिकांनी महापालिकेसमोर आंदोलन देखील केलं होतं. एकीकडे या प्रकरणावरून राजकारण रंगलेले असतानाच अनेक नेत्यांनी या घटनास्थळाला भेट देत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले होते. या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासून सक्रिय असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांनी आज अधिकाऱ्यांसोबत संपूर्ण आंबिल ओढयाची पाहणी केली.यावेळी इथे होणाऱ्या कामाबाबत सादरीकरण देखील करण्यात आलं.
यानंतर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या,” आंबिल ओढ्याच्या काठी राहणाऱ्या नागरिकांचे कायमचे स्थलांतर होणार नाही.फार तर तात्पुरते स्थलांतर होईल. आत्ता जिथे कारवाई झाली ,घरे पाडण्यात आली , ती जागा पसंत नसेल तर दुसरीकडे स्थलांतर करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली होती. मात्र मार्ग काढण्याआधीच कारवाई झाली.”
माझ्याबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारि राजेंद्र निंबाळकर उपस्थित आहेत मी त्यांना ज्या नागरिकांची घरे महानगरपालिकेने पाडली ती घरे लवकरात लवकर बांधून देण्याचे आदेश दिले आहेत माझी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आंबील ओढा येथील ज्या नागरिकांची घरे पडली ती लवकरात लवकर कसे बांधून देता येईल याची चर्चा केली आहे मी आज कात्रज येतील प्राणि संग्रहालयाची व लेक टॉऊन येथील पाहनी केली आहे तेथील लवकरात लवकर जी कामे राहिलेली आहेत त्या कामाचा आढावा घेऊन मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ती कामे लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल ही कामे लवकरात लवकर आपण कसे पूर्ण करू शकतो हे बघणार आहोत.असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
