देशात आरक्षण संपवण्याचे फार मोठे षढयंत्र सुरू आहे – संतोष शिंदे

पुणे – राज्यात सध्या विविध पक्षांचे आरक्षणाचे फसवे आंदोलन सुरू आहेत. ज्या लोकांनी केंद्रात राहून राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द केलं, तेच लोक आरक्षण टिकले पाहिजे म्हणून आंदोलन करत आहेत. जातीनिहाय जनगणनेचा आकडेवारी केंद्र सरकारने जाहीर करावी किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये द्यावी. दुसऱ्या बाजूला मराठा समाज आरक्षण मागत असताना सुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढवली जात नाही आणि केंद्र सरकार व त्यांचे नेते आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, शिवसेना असो की भाजप हे सगळे छुपे आरक्षण विरोधी आहेत, यांना गोरगरीब उपेक्षित समाजाचं काहीही देणे घेणे नाही. आमचे छत्रपती शाहू महाराज होते म्हणून सर्व समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला अन्यथा, उपेक्षित समाजाचा प्रचंड फार मोठं नुकसान झालं असतं. राजर्षी शाहू महाराज लोक कल्याणकारी राजे होते म्हणून त्यांना दलित, पीडित, शेतकरी, कष्टकरी समाजाची जाण होती. सर्व समाज एकसंघ राहिला पाहिजे ही त्यांची तळमळ समृद्ध भारताची ओळख आहे. डॉ. आंबेडकर सुद्धा म्हणाले, ‘एक वेळ मला विसरा पण आपल्या शाहू महाराजांना विसरू नका…’ हीच राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि कर्तृत्वाची पावती आहे. म्हणूनच आज समाज तरला, सुधारला. लोककल्याणकारी माझ्या राजाची सर कुणालाही भरून काढता येणार नाही. म्हणून चालू 2021-22 च्या राष्ट्रीय जनगणनेत जातनिहाय जनगणना झाली पाहिजे… असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी मत व्यक्त केले.

आमचा आरक्षण टिकवण्यासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष सुरू राहील. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे हे संपवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल हा महाराष्ट्र कदापिही खपून घेणार नाही… त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे ते आमच्या सरसगट गोरगरीब समाजाला मिळालंच पाहिजे… असे मत शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले.

‘संभाजी ब्रिगेड पुणे’ यांच्या वतिने… राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंती निमित्त सहकारनगर येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‘आरक्षणाची शपथ’ घेण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, शहर कार्याध्यक्ष नितीन वाघीरे, शहर सचिव संदिप कारेकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, संघटक आदित्य खेडेकर, पर्वती विधानसभा अध्यक्ष कुमार पवार, खडकवासला विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रायकर, खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष सनी देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: