Breaking News पुण्यात आंबिल ओढ्या परिसरात राडा, घरं पाडण्यास स्थानिकांचा विरोध; कारवाई नेमकी कुणाची?

पुणे : पुण्यात आंबील ओढा येथे पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा झाला आहे. आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला.

आंबिल लोढा परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे पोलिसांसह पालिका अधिकारी पोहोचले होते. मात्र यावेळी स्थानिकांनी अतिक्रमण हटवण्यास विरोध केलं. यावेळी ‘पुणे पोलीस मुर्दाबाद’ अशा घोषणादेखील देण्यात आल्या. काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे.

पोलीस अचानक आले आणि आम्हाला घर खाली करण्यास सांगत आहेत. आम्हाला या कारवाईसंबंधी कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. आमचं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. आम्ही येथे ५० ते ६० वर्षांपासून राहत असून आम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करा अशी नागरिकांची मागणी आहे. तसंच पालिका नाही तर खासगी बिल्डरच्या नोटीशीनंतर कारवाई सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नोटीशीवर पुणे मनपाचा शिक्का का नाही? अशी विचारणा स्थानिक रहिवाशांनी केली आहे. आंबील ओढा येथील 100 नागरिकाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुणे महानगरपालिकेचा सत्ताधारी पक्षाचा व विरोधी  पक्षाचा एक ही नगरसेवक येथे कधीच फिरकला नाही फक्त निवडणुका आल्यानंतर ते मत मागायला
येतात असे स्थानिक नागरिक म्हणत होते.


दशरथ कांबळे म्हणाले, आंबील ओढा येथे साठ वर्षा पासून राहत आहोत आमच्या येथे पावसाच्या वेळी ओढ्यातले पाणी आमच्या घरात घुसते तेव्हा स्थानिक प्रतिनिधी आमदार व खासदार आमच्या मदतीला  येत नाहीत, आज आमच्यावर पोलीस व पालिका अधिकारी यांनी आमच्या घरावर कारवाई केली आहे आम्ही स्थानिक नगरसेवकांना फोन करून विचारले तर त्यांनी आमचा फोन सुद्धा उचलला नाही. माझी मुलगी  व पत्नी मोलमजुरी करून व मी गवंडी काम करून जगत आहे पोलिसांनी आज आमच्या घरा वर कारवाई केली आहे आता आम्ही जायचे कुठे? जगायचे कसे? आम्ही पोलिसाना विचारले  तुम्हाला कारवाई करण्याचे अधिकार कोणी दिले?
पोलीस म्हणाले  वरन  आदेश आला आहे आम्ही महापौर मुरलीधर मोहोळ यांना फोन करून विचारले ते म्हणाले मी कुठलेही कारवाई करण्याचे आदेश दिले नाहीत असे महापौरांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: