कोरोनाची लाट थोपविण्यासाठी लसीकरण हेच मोठे शस्त्र – आमदार माधुरी मिसाळ

पुणे : कोरोनाकाळात डॉक्टर, नर्स आणि पोलिस यांच्याबरोबर लोकप्रतिनीधी हे देखील कोरोना योध्देच आहेत. त्यांनी देखील कोरोनाकाळात पुढे येऊन काम केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी आता महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभागात लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. त्याचबरोबर दुर्गमभागात, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांना लसीकरणाचे महत्व पटवून दिले पाहिजे. कारण कोरोनाची लाट थोपविण्यासाठी लसीकरण हेच मोठे शस्त्र आहे, असे मत आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

लक्ष्मीनगरमधील सह्याद्री ग्राऊंडवर मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्मिता वस्ते व विनोद वस्ते यांच्या विशेष प्रयत्नांतून मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी नगरसेविका स्मिता वस्ते, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेवक धीरज घाटे, शैलेश लडकत, सुनील खंडाळे, विनया बहुलीकर, अश्विनी पांडे, अप्पा खंडाळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

स्मिता वस्ते म्हणाल्या, कोरोनाची लाट थोपविण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात  लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच लसीकरणाच्यावेळी गर्दी होऊन नये म्हणून मैदानावर सर्व सोयी सुविधायुक्त केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या नागरिकांना आॅनलाईन नोंदणी करणे शक्य नसेल अशा नागरिकांनी केंद्रावर येवून नोंदणी करण्याची देखील सुविध उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील काळात अंध व्यक्तींसाठी तसेच नागरिकांच्या आॅन ड्राईव्ह लसीकरणासाठी देखील प्रयत्न करणार आहोत, असे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: