सोळा महिन्यांमध्ये अपना बनली 4100 कोटींची कंपनी

बंगळुरू – भारतातील वाढत्या कामगारवर्गासाठी व्यावसायिक नेटवर्किंग करणाऱ्या ‘अपना’ (Apna) या जॉब प्लॅटफॉर्मने ‘इनसाइट पार्टनर्स’ आणि ‘टायगर ग्लोबल’ यांच्याकडून 511 कोटी रु. इतक्या ‘सिरीज बी’ फेरीतील गुंतवणुकीची उभारणी केली आहे. ‘सिक्युरा कॅपिटल इंडिया’, ‘लाइटस्पीड इंडिया’, ‘ग्रीनओक्स कॅपिटल’ आणि ‘रॉकेटशिप व्हीसी’ या विद्यमान गुंतवणूकदारांनीही या फेरीमध्ये भाग घेतला. या गुंतवणुकीमुळे ‘अपना’चे (Apna) बाजारातील अग्रगण्य स्थान व तिची व्यावसायिक वाढ या बाबी निर्विवादपणे सिद्ध झाल्या आहेत. तसेच, या गुंतवणुकीच्या निमित्ताने ‘अपना’ने (Apna) आपले उत्पादन सादर केल्यानंतरच्या 16 महिन्यांत 657 कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक प्राप्त केली आहे आणि आता या कंपनीचे बाजारमूल्य 4161 कोटी रु. इतके झाले आहे.

कोविडच्या संकटातून देश सावरला जात असताना देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यात हातभार लावण्याकरीता ‘अपना’ (Apna) येत्या 6 महिन्यांत आपले कामकाज असणाऱ्या शहरांत आणि देशभरात इतरत्र व्यावसायिक वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. आताची गुंतवणूक यासाठीच कंपनीकडून वापरण्यात येणार आहे. यामध्ये, कंपनी आपल्या ‘एडटेक प्लॅटफॉर्म’ची कौशल्यासाठीची क्षमता वाढविणार आहे, तसेच बुद्धिमान कर्मचारीवर्ग घेण्याचे, जागतिक दर्जाची अभियांत्रिकी व उत्पादन क्षमता वाढविण्याचेही कंपनीचे नियोजन आहे. याव्यतिरिक्त, येत्या वर्षभरात दक्षिण-पूर्व आशिया आणि अमेरिका यांसारख्या उच्च व्यावसायिक क्षमता असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याची योजनाही ‘अपना’तर्फे (Apna) आखण्यात येत आहे.

“अब्जावधी लोकांच्या रोजगार व कौशल्यविषयक समस्या सोडविण्यासाठी आम्ही ‘अपना’मध्ये (Apna) नवीन दृष्टीकोन अंगीकारण्याचा निर्धार केला आहे. गेल्या महिन्यातच ‘अपना’ने (Apna) दीड कोटीहून अधिक व्यक्तींच्या नोकरीच्या मुलाखती आणि कामाशी संबंधित संभाषण यांची व्यवस्था करून दिली. यामध्ये वापरकर्त्यांनी एकमेकांना व्यवसाय सुरू करण्यास, कंत्राटी कामगार शोधण्यात किंवा नवीन कौशल्य शिकण्यास मदत केली. आम्ही अद्याप समस्या सोडवण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत आणि आमच्या नवीन भागीदारांच्या पाठिंब्याने हा प्रवास यापुढे सुरू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे ‘अपना’चे (Apna) संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मित पारीख यांनी सांगितले.

“आम्ही गेल्या वर्षभरात ‘अपना’च्या (Apna) प्रगतीमुळे प्रभावीत झालो आहोत. डिजिटल व्यावसायिक ओळख, नेटवर्क, कौशल्य प्रशिक्षण आणि उच्च दर्जाचे रोजगार शोधण्यासाठी भारताच्या कर्मचार्‍यांसाठी बाजारपेठेत अग्रणी असलेला प्लॅटफॉर्म या कंपनीने तयार केला. उच्च गुणवत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध अतिशय सुलभ पद्धतीने घेण्यात ‘अपना’ (Apna) मदत करीत असल्यामुळे आणि ग्राहकांचे समाधान करण्यात ‘अपना’ची नोंद उत्कृष्ट अशी असल्यामुळे अनेक नियोक्ते ‘अपना’शी (Apna) वेगाने जोडले जात आहेत. आमच्या गुंतवणकीमुळे ‘अपना’च्या (Apna) विकासाचा वेग वाढू शकेल, तिच्या कामकाजाचे प्रमाण वाढेल आणि भारतातील कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळण्यात सुधारणा होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो,” असे प्रतिपादन ‘इनसाईट पार्टनर्स’चे व्यवस्थापकीय संचालक निखिल सचदेव यांनी केले.

जागतिक स्तराशी संबंधित समस्येबद्दल आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून तोडगा काढण्याच्या पद्धतीमुळे ‘अपना’च्या (Apna) व्याप्तीला मर्यादा नाहीत. ‘टायगर ग्लोबल’चे भागीदार ग्रिफिन श्रूडर म्हणाले, “नोकरी शोधण्याच्या, अर्ज करण्याच्या आणि नियोक्ता व उमेदवार यांच्यात परस्पर संवाद घडवून आणण्याच्या प्रक्रियेचे डिजिटायझेशन करण्यावर ‘अपना’चा (Apna) भर असून, त्यात नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्ये क्रांती घडविण्याची क्षमता आहे. कर्मचाऱ्यांना व्यावसायिक नेटवर्क तयार करण्यात आणि स्वत:ची कौशल्य वाढविण्यास ‘अपना’चे (Apna) अ‍ॅप मदत करते. भारतातील व परदेशांतील नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करण्याच्या ‘अपना’च्या (Apna) नियोजनामुळे या कंपनीशी भागीदारी करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

Leave a Reply

%d bloggers like this: