कोरोनामुळे विद्यार्थ्यांवर झालेला परिणामावर चर्चासत्र

पुणे : कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनावर झालेला परिणाम या विषयावर चर्चासत्राचे आयोजन श्री आनंद ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे सहभागी होणार आहेत. शुक्रवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 12 वाजता गुगल मीटवर हे चर्चासत्र होणार आहे.

ग्लोबल टीचर्स पुरस्काराने सन्मानित रणजित दिसले, डिजिटल शिक्षणतज्ञ हर्षल विभालिक, बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय मानकर, तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.

या वेबिनारमध्ये शाळा सुरू नसल्याने विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता, आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने ढासळलेली परिस्थिती, त्यात शाळेकडून फीमध्ये सवलत न देणे भवितव्याची काळजी अशा विषयांवर चर्चासत्रात प्रकाश टाकण्यात येणार आहे.

चर्चासत्राचे संयोजन आनंद रेखी, डॉ. धर्मेंद्र शाह, डॉ. राजेश पवार, संकेत खरपुले, सौरभ लोखंडे, आशिष अभ्यंकर, महेश कुलकर्णी, नगरसेवक कुंदन गायकवाड, सागर हिंगने तसेच विजय चोरडिया, पारस यादव, मधुकर पाठक यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: