नवनाथांचा महिमा आता टेलिव्हिजनवर

महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झालेली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. “गाथा नवनाथांची” ही मालिका येत्या २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.  आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा या मालिकेतून प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. ही पौराणिक मालिका असून काही प्रसंग दाखवण्यासाठी विफेक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत विफेक्सचा वापर फार कमी प्रमाणात गेला जातो. त्यामुळे या मालिकेतील विफेक्स हा एक महत्वपूर्ण भाग असणार आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: