महापािलका शाळांतील विद्यार्थ्यांना इंटरनेटसह टॅब देण्याचा स्थायी समितीचा निर्णय

पुणे – काेराेनामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी महापािलकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना इंटरनेट सह टॅब देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. विद्यार्थी संख्या निश्चित झाल्यानंतरच खरेदीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या संदर्भात स्थायी समिती समोर प्रस्ताव मांडला होता त्याला मंजुरी दिली. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

कोरोनामुळे मागच्या मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत .काही लहान मुलाजवळ टॅब नसल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नाही. कोरोनाचा लहान मुलांना धोका हा भरपूर आहे या काळात त्यांना शाळेत बोलवणे उचित नाही. राज्य शासनाने त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे प्रत्येकाजवळ टॅब असेल तर प्रत्येक मुलाला शिक्षण घेता येईल कोणाची शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. महापालिका दरवर्षी विद्यार्थ्यांना पुस्तके गणवेश, रेनकोट, बूट, स्वेटर ,इत्यादी गोष्ट देत असते गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात ही तरतूद खर्ची पडली नाही. पण या वर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ही तरतूद खर्ची पडली सुमारे 38हजार विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सह टॅब खरेदी करण्याचा निर्णय घेतला यामुळे विद्यार्थ्यांना रोज ऑनलाइन शिक्षण शिकता येईल असे रासणे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: