Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

.. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हिंदी निर्मात्यांवर कारवाई करून दाखवा – अमेय खोपकर

मुंबई : मराठी निर्मात्यांकडून चित्रीकरणांसाठीचे कोव्हिडसंबंधीत सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत पण अनेक ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन केला आहे. तसेच आता या निर्मात्यांवर कारवाई करण्याची प्रशासनाने धमक दाखवावी, असेही म्हटले आहे.

राज्य सरकारने मुंबईत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच शूटिंग करण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र काही ठिकाणी हिंदी निर्मात्यांकडून या नियमांचं उल्लंघन होत आहे. कोरोनाचं संकट अजून दूर झालेल नाही, असं खरंच यंत्रणांना वाटत असेलस तर मग जे नियम पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक त्यांनी दाखवावी. आणि जर कोरोनाचे आकडे कमी होत असतील तर सरकारने शूटिंगसाठी बनवलेल्या नियमांचा नव्याने विचार करावा” असेही मत खोपकर यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading