मराठा समन्वयकांसह मुख्यमंत्र्यांना भेटणार – संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर – कोल्हापूरच्या मराठा मूक मोर्चा आंदोलनात जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजेंना आवाहन केलं होतं की मुंबईत चला, मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो. त्यांच्या या आवाहनला प्रतिसाद देत खासदार संभाजीराजे छत्रपती उद्या गुरुवारी मराठा समन्वयकांसोबत मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकलं असताना आपणही एक पाऊल पुढे टाकू असं सांगत त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र यावेळी त्यांनी नाशिक, रायगड. अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी मुंबईत चर्चेला येण्याची चांगली भूमिका घेतली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि संबंधित मंत्री उपस्थित असतील. याचं मी स्वागत करतो. पण चर्चेला गेलो याचा अर्थ आम्ही समाधानी झालो असा नाही. ती चर्चा होणार आणि त्यातून काय निष्पन्न होणार हे आम्ही पाहणार. चेतावणी द्यायची नाही पण ठरलेले मोर्चा नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगड येथे होणारच आहेत”. दरम्यान जर राज्य सरकारने सगळे प्रश्न मार्गी लावले तर मूक आंदोलन नाही तर नाशिकला विजयोत्सव करु असंही त्यांनी जाहीर केलं.

Leave a Reply

%d bloggers like this: