मराठमोळ्या रुपाली भोसलेचं नऊवारीत फोटोशूट

मराठमोळ्या रुपाली भोसलेचं नऊवारीत फोटोशूट ‘आई कुठे काय करते!’ या मालिकेत खलनायिकेची (संजना ) भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले ही सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. लाल रंगाची नऊवारी, नाकात नथ, आंबाडा अशा मराठमोळ्या आऊटफिटमध्ये ती कमाल दिसतीये. नुकतंच रुपालीनं तिच्या इन्स्टाग्रामवर हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. नेटकऱ्यांनाही तिचा हा लुक आवडला असून त्यांच्या पसंतीस ते पात्र ठरत आहे.  

रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये ती चर्चेत आलेली होती.  सध्या ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या संसारात मोडनाऱ्या संजनाची व्यक्तिरेखा साकारत आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: