मराठा आरक्षण – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली श्रीमंत शाहू महाराजांची भेट

कोल्हापूर – राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात न्यू पॅलेस वरती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली आहे.

तासभर सुरू असणाऱ्या या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू महाराज यांच्या मध्ये विविध विषयांवर चर्चा झाली तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या मराठा आरक्षणाबाबत अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या सोबत विशेष चर्चा केली.

अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेमधून राज्य सरकार सकारात्मक दिसते का असा प्रश्न विचारला असता ,माध्यमांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले की राज्य सरकार सकारात्मक आहे, जे शक्य आहे ते नक्कीच होईल पण उद्या जर तुम्ही चंद्र पाहिजे सूर्य पाहिजे म्हणालात तर कसे आणून देणार?

तसेच केंद्र शासनाने जर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जर लक्ष दिले तर constitutional amendment करूनच तुम्हांला तुमचे पुढचे पाऊल टाकता येईल, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे शक्य आहे ते नक्की केले जाईल, असे शाहूमहाराज यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षणा सोबतच विविध सामाजिक विषयांवर तीदेखील चर्चा झाल्याचं शाहूमहाराज यांनी म्हटले आहे ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते,

Leave a Reply

%d bloggers like this: