आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर बोगस  कर्ज काढल्या संदर्भात तीव्र  आंदोलन करणार – अतुल खूपसे पाटील

पुणे – करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचे विठ्ठल कॉर्पोरेशन , म्हैसगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी शेतकऱ्यांना 2013 साली खत देतो म्हणून  कागदपत्रे जमा केली संबंधित शेतकऱ्यांना खत न देता दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून पुण्यातील कोथरूड परिसरात असलेली  पंजाब नॅशनल बँकेकडून शेतकऱ्यांची नावे कर्ज स्वरूपात रक्कम 22  कोटी 11 लाख  उचलल्याचे समोर आले आहे .याबाबत कारखान्याचे चेअरमन आणि संबंधित अधिकारी त्याची पंजाब नॅशनल त्यावेळचे शाखाधिकारी व आमदार संजय शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांना खत  देतो म्हणून  1500 शेतकऱ्याच्या नाववर रक्कम रुपये 22 कोटी उचलले आहेत. यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर पुणे यांच्या मालकीची 100 एकर जमीन खरेदी केली तसेच या रकमेतून दोन ठिकाणी फार्म ची निर्मिती केली स्विमिंग टॅंकची सुद्धा उभारणी केली आहे शेतकऱ्यांच्या नावावर न कळविता कर्ज काढून आमदार संजय मामा शिंदे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर 2ते 3 लाखाचे कर्ज आहे.
असेच कर्ज संजय शिंदे यांचे पुतणे माढयाचे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी काढलेले होते त्यासंदर्भात बार्शी कोर्टात गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच त्यांचे पुतणे विक्रमसिंह शिंदे यांनी कमलाई सहकारी साखर कारखाना येथे कर्ज काढलेले होते हे ही कर्ज त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीत बसविलेले आहे. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या व त्यांच्या वारसांचा कारखान्याच्या माध्यमातून असा उद्योग आहे प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर 2 ते 3 लाख कर्ज उचलावयचे आणि कर्जमाफी होईपर्यंत थांबायची आणि कर्जमाफीत ते बसवून बँकेचे अधिकारी मॅनेज करून त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ उचलायचा कर्जमाफीचे शासनाचे खरे लाभार्थी हेच असून जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीचे सरकार आले तेव्हा तेव्हा करमाळा माढा तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील जनतेवर अन्याय झाला. हे कर्ज 2013 साली उचलेले असून 2017 साली शेतकऱ्यांच्या परस्पर रिनूव्य केलेले आहे गेल्या आठ दिवसापूर्वी 900शेतकऱ्यांना यासंदर्भात नोटीस आलेली आहे उरलेल्या600 शेतकऱ्यांना नोटिस पाठवणार आहोत असे बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांनी सांगितले करमाळा तालुक्यातील शेतकरी भांबावून गेला आहे शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत. या प्रसंगी आम्ही शेतकऱ्यांना सोबत घेऊन पंजाब नॅशनल बँकेपुढे
बुधवार दिनांक 16/6/2021 रोजी सकाळी शाखा अरोरा टॉवर एमजी रोड पुणे-1 येथे हलगी नाद वाजवून भीक मागो आंदोलन करून त्यातून जमा झालेली निम्मी भिक बॅंकेच्या अधिकाऱ्यांनासुपुर्त करणार आहोत तसेच निम्मी भिक करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना पाठविणार आहोत.
आमच्या कर्ज काढून जर त्यांना कमी पडत असेल तर आणखी भीक मागून घ्या म्हणून भिक मागायचे आंदोलन करणार आहोत. करमाळा तालुक्यातील मतदार आणि शेतकरी भिक मागून त्यांना रक्कम पुरविणार आहोत करमाळ्याचे आमदार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांची अशीच छळवणूक केलेली आहे. जो जो त्यांच्याविरोधात उठला त्यांना त्यांना डुप्लिकेट केसेसच्या माध्यमातून गुंतविण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून सर्वसामान्य शेतकरी सोबत येण्यास  घाबरत आहेत त्यातील काही शेतकरी पोलीस आहेत पोलिसांच्या नावावरही कर्ज काढलेले आहे. काही सरपंच तर काही पोलिस पाटील आहेत तरी करमाळ्याच्या आमदारांनी संबंधितांनाही सोडलेले नाही. अशा प्रकारचा अन्याय अत्याचार करून स्वतःच्या फायद्यासाठी मोजमजा करण्यासाठी फार्म हाऊस बनविणे तसेच 100 /100 एकर जमीन यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर पुणे या कारखान्याची घेवून हजारो एकराची इस्टेट त्यांनी जमा केलेली  आहे .म्हणून त्यांच्या इस्टेटीची चौकशी ईडी मार्फत व्हावी. म्हणून आम्ही ईडी कार्यालयातही एक प्रत देण्यात येणार आहोत आज आम्ही मान्य मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय जिल्हाधिकारी पुणे प पोलीस आयुक्त पुणे माननीय साखर आयुक्त पुणे माननीय शाखाधिकारी पंजाब नॅशनल बँक मंडळ अरोरा टॉवर पुणे-1 माननीय विठ्ठल कॉपोरेशन म्हैसगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर यांचेकडे रीतसर तक्रार पाठवलेलली आहे.
त्यांनी शेतकऱ्यांचे नावे उचललेले कर्ज लोकसभा विधानसभा लढविण्यासाठी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी घोडेबाजारासाठी घालविण्यात आलेले आहेत म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्याची आम्ही मागणी करत आहोत. येणाऱ्या बुधवार दिनांक16/6/2021 रोजी सकाळी पंजाब नॅशनल बँक अरोरा टॉवर एमजी रोड पुणे -1 येथे हलगी नाद वाजवून भीक मागो आंदोलन करणार आहोत. संबंधित अधिकाऱ्यांवर व करमाळ्याच्या कारखान्याचे सर्वेसवा असणारे चेअरमन शेतकऱ्यांना फसविणायावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे .याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील. अध्यक्ष उजनी धरण पाणी संघर्ष समिती अतुल खूपसे पाटील यांनी पत्रकारांना आज याबाबत माहिती दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: