Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सिंहगड रोड उड्डाणपुलासाठी 135 कोटी रुपयांचा निधी मंजूर

पुणे : सिंहगड रस्त्यावरच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे .पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने अधिक खर्च करायला मंजुरी दिली आहे. आता नवीन काम कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. सिंहगड रस्त्यावरची वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे महापालिकेने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता.

2018-2019 मध्ये त्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर सल्लागारांची नेमणूक केली होती. या सल्लागारांकडून प्राप्त झालेल्या 4 पर्यायांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचे सुचविले होते .यापैकी राजाराम पूल तेथून टाईम थेटर पर्यंत पूल बांधला जाणार आहे .या कामासाठी 2019- 2020 मध्ये कोटीची तरतूद केली होती. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली होती .पण लॉकडाऊन  मुळे या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नव्हता .आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .यासाठी लागणारी 135 कोटींची तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करायला स्थायी समितीने मंजुरी दिली .अशी माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading