ग्रामपंचायत कुसगाव ने केली ईमोसाइन्स कंपनीच्या सहकार्याने वचनपुर्ती

पुणे – शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधुन कुसगाव ग्रामपंचायत मधील नवीन निवडून आलेल्या सरपंच,उपसरपंच व इतर सर्व ग्रापंचायत सदस्य यांनी गावामध्ये असणाऱ्या ईमोसाईन्स या कंपनशी चर्चा करून कुसगाव च्या गावकऱ्यासाठी अखेर फिल्टर केलेले पाणी मिळविण्यात यश प्राप्त केले आहे.

इमोसाईन प्रा लि.या कंपनी यांच्यातर्फे कै.वसुंधरा नारायणा आपटे यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत कुसगाव ला फिल्टर प्लांट देण्यात आला आहे.सदर वॉटर फिल्टर प्लांटचे राजमाता जिजाऊ वॉटर फिल्टर प्लांट असे नामकरण करण्यात आले आहे.वॉटर फिल्टर प्लांट च्या उद्घाटनासाठी सरपंच आनंदीबाई लांघे, उपसरपंच माऊली मांढरे ग्रामसेवक सुनील भोकरे ग्रा.प.सदस्य सुरेखा तांबट,रंजना गोरे, पुष्पा मांढरे, छाया पांगारे, मयूर मांजरे, प्रतीक गायकवाड, ग्रा.कर्मचारी.रामदास मांढरे, रवी गायकवाड, इमोसाईनस कंपनीतर्फे स्वप्निल तायडे व पवार सर हे उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: