Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्य बोर्डाच्या 12 वी परीक्षा अखेर रद्द

मुंबई – बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता. या प्रस्तावावर आज आपत्ती व व्यवस्थापन विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या १४ लाख विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची सध्याची परिस्थिती, व आजारांच मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेचा संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावी परीक्षा रद्द केली आहे. आता त्याच पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठविला होता. या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्तावावर मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आपत्ती व व्यवस्थापन विभागा बैठक पार पडली आहे. या बैठकीत मदत व पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थितीत होते. या बैठकीत कोरोनाच्या महामारी काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा लक्षात घेता महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता अधिकृतरीत्या महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading