मर्सिडीझ-बेंझ आपल्या ग्राहकांसाठी सादर करत आहे रिटेल विक्रीची अभिनव संकल्पना
पुणे: लक्झरी गाड्यांची भारतातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी मर्सिडीझ-बेंझ इंडियाने भारतात आपल्या रिटेल व्यवसायात अतिशय महत्त्वाच्या आणि पायाभूत परिवर्तनाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये कंपनीने आधुनिक, भविष्यवेधी आणि अधिक ग्राहककेंद्री ‘डायरेक्ट टू कस्टमर‘ मॉडेल – ‘रिटेल ऑफ द फ्युचर‘ (आरओटीएफ) लागू करत आहे. या नवीन बिझनेस मॉडेलनुसार गाड्यांच्या संपूर्ण स्टॉकची मालकी मर्सिडीझ-बेंझ इंडियाकडे असेल आणि त्यांची विक्री कंपनीने नियुक्त केलेल्या फ्रँचायझी पार्टनर्समार्फत केली जाईल. नवीन गाड्यांचे इन्व्हॉयसिंग थेट ग्राहकांना केले जाईल, ऑर्डर्सवर कार्यवाही आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी मर्सिडीझ-बेंझ इंडियाची असेल. यामध्ये ग्राहकांना पारदर्शी किंमत आणि खरेदीचा अनुभव मिळेल.
मर्सिडीझ-बेंझ फ्रँचायझी पार्टनर्सच्या प्रमुख भूमिका आणि जबाबदाऱ्यांमध्ये ग्राहकांसोबत संपर्क प्रस्थापित करून ते कायम ठेवणे, मार्केट विकसित करणे आणि मर्सिडीझ-बेंझ गाड्यांची विक्री सहजसोपी बनवणे यांचा समावेश आहे. जगभरात रिटेल व्यवसायात होत असलेला डिजिटायझेशनचा प्रसार आणि होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ग्राहककेंद्री आणि भविष्यवेधी आरओटीएफ मॉडेल ग्राहक, फ्रँचायझी पार्टनर्स व ब्रँड या सर्वांसाठी फायदेशीर ठरेल.
भारतात या उद्योगक्षेत्रातील पहिल्या ‘डायरेक्ट टू कस्टमर‘ मॉडेलची घोषणा करताना मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, “उत्कृष्टतेची नवी व्याख्या रचणे हे आमचे २०२१ चे उद्धिष्ट आहे. आमच्या ग्राहकांसाठी खरेदीच्या शानदार अनुभवांमध्ये अधिक जास्त सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘रिटेल ऑफ द फ्युचर‘ सुरु करण्यात येत आहे. हे आमचे दीर्घकालीन धोरणात्मक पाऊल रिटेल व्यापारात एका महत्त्वपूर्ण परिवर्तनाची सुरुवात करून आमच्या ग्राहक केंद्री वृत्तीला अधिक जास्त बळ देईल. ग्राहक आणि फ्रँचायझी पार्टनर्स या दोघांसाठी हे लाभकारी आहे, यामुळे भविष्याप्रती आमची सुस्पष्ट, दीर्घकालिक, प्रभावी आणि डिजिटल दृष्टी अधोरेखित होते. नवे विक्री चॅनेल सुरु झाल्याने ग्राहकांच्या आकांक्षा आणि गरजांमध्ये व्यापक बदल घडून आले आहेत आणि ग्राहकांप्रती अतिशय सजग ब्रँड म्हणून आम्ही ग्राहकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमच्या सध्याच्या व्यवसाय मॉडेलला अधिक जास्त अनुकूलित केले आहे. भारतीय ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी मर्सिडीझ-बेंझने रिटेल ऑफ द फ्युचरच्या रूपाने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे.”
रिटेल ऑफ द फ्युचर हे ग्राहककेंद्री इकोसिस्टिम निर्माण करण्यासाठी उचलले गेलेले एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना याआधी कधीही न मिळालेला, सहज व पूर्णतः पारदर्शक अनुभव प्राप्त होईल.”
