Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

मराठा आरक्षणासाठी  सामूहिक प्रयत्न आवश्यक -नारायण राणे

पुणे – शिवसेना -काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे असलेले आरक्षण गेले आहे अशी टीका भाजप खासदार नारायन राणे यांनी राज्य सरकार वर टीका केली.

आघाडी सरकारच्या नेमलेले  वकील सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणासाठी बाजू मांडण्यासाठी कमी पडले असा आरोप त्यांनी यावेळी केला माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी मराठा आरक्षण या मुद्यावर पत्रकारांशी वार्तालाप केला त्या वेळी ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या समितीत जे मुद्दे चालू परिस्थिती हाय लाईट केले होते ते मुद्दे हाय लाईट झाले नाहीत त्यामुळे आरक्षण रद्द झाले असा आरोप देखील त्यांनी केला पत्रकार  परिषदेला शहराध्यक्ष जगदीश मुळीक महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर ,भाजप प्रवक्ते माधव भांडारी सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक धीरज घाटे
उपस्थित होते.

संभाजीराजेंचा मराठा आरक्षणाचा मुद्द्यांवर बोलताना आणि आंदोलनाबाबत विचारल्यावर ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्याचे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.” संभाजीराजे यांनी म्हणून कोणी पुढारी बनत नाही. रायगडावर कोण आहेत आंदोलन करायला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.”

दरम्यान काँग्रेस वर आणि नाना पटोले यांचावर देखील त्यांनी टीका केली.” नाना पटोले यांना तोडफोड करायची काड्या करायची सवय आहे. ते पक्ष जोडणार नाहीत तर तोडणारे आहेत. परत टीका केली तर नाना आम्ही वाजवून टाकू… भजन ” असं राणे म्हणले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading