fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

पोलीस खात्याला १ हजार पुस्तकांची भेट !

पुणे : कोविड काळात खूप अवघड परिस्थितीत नागरिकांना विश्वास देत आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या पुणे पोलिसांना रोहन प्रकाशन आणि पुण्यभूषण फाऊंडेशन या दोन संस्थांतर्फे आज एक विशेष भेट म्हणून १ हजार पुस्तके  देण्यात आली.  रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विनोदी साहित्यातील काही निवडक पुस्तकांच्या १ हजार प्रती या संस्थांतर्फे पोलीस खात्याला भेट देण्यात आल्या.

 यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त  मितेश घट्टे, लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर उपस्थित होते. 

गेल्या वर्षीपासून अत्यंत बिकट अशा कोविड आपत्ती काळात पुणे पोलीस निग्रहाने, चिकाटीने आणि जबाबदारीने अविरत काम करत आहेत. नागरिकांची मनःस्थिती सांभाळत आणि वेळोवेळी त्यांना आश्वस्त करत, धीर देत पोलीस विभाग काम करत आहे. शहर अनुशासनाची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अनेकदा स्वतःचा जीवही धोक्यात घालून ते पार पाडत आहेत. वेळेची मर्यादाही त्यांच्या कामाच्या आड येत नाही. पोलीस खात्याच्या या कामाबद्दल कौतुक आणि आदर व्यक्त करण्यासाठी ही विशेष भेट देण्यात आली.  या कामाचं एक दडपण त्यांच्या मनावर नकळतपणे असेलच. पोलिसांच्या मनावरचा तणाव कमी करता यावा, यासाठी या दोन्ही संस्थांनी हे स्तुत्य पाऊल उचललं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading