Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची ४ जूनपासून

आजच्या तारखेला आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’ सोनी मराठी वाहिनीवर १४ जूनपासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत असतात, गुन्ह्यांची चाहूल ही आधीच लागेलेली असते पण आपण ती नजरअंदाज करतो. या मालिकेतून प्रेक्षकांच गुन्हेगारी विश्व आणि त्यापासून कसं सावध राहता येईल यावर प्रबोधन होईल; 

अभिजित खांडकेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. अभिजित खांडकेकर हा एक उत्तम सूत्रसंचालक असून त्याने काही काळ रेडिओ जॉकी म्हणून देखील काम केले आहे. त्याची उत्तम संवाद फेक आणि भाषेवरचे पकड यामुळे तो प्रेक्षकांना अजून आपलासा वाटतो. 

क्राईम शोज ना प्रेक्षकांची विशेष पसंती असते. या आधी देखील बऱ्याच क्राईम शोजनी प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आणि अशाच धाटणीचं कार्यक्रम मराठीत सोनी मराठी वाहिनी घेऊन आली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading