Saturday, June 13, 2026
BusinessLatest NewsPUNE

छोट्या उद्योजकांना मोफत डिजिटल होण्याची संधी 

पुणे :  प्रत्येक उद्योजकाने व्यवसायवृद्धीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करणे हि काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने उद्योग मित्र संस्थानाशिक आणि अब्लिफ्री बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आणि येस बँकेच्या सहकार्याने सूक्ष्मलघुमध्यम उद्योजकघरगुती उत्पादन असणारे व्यावसायिकबचत गटकिरकोळ विक्रेते यांच्यासाठी डिजिटल एमएसएमई शिबिराचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन भारत सरकारच्या राष्ट्रीय एमएसएमई मंडळाचे सदस्य प्रदीप पेशकर यांच्या हस्ते एका वेबिनार मध्ये करण्यात आले. यावेळी येस बँकेचे उपाध्यक्ष आणि एमएसएमई व्यवसायाचे प्रादेशिक प्रमुख विवेक सम्मनवार ,येस बँकेचे उपाध्यक्ष आणि नॉलेज बँकिंग चे प्रमुख अविनाश चंद्र आणि एब्लिफ्री बिझनेस नेटवर्क चे संचालक गोविंद सदामते उपस्थित होते.

पेशकर म्हणाले, प्रत्येकच व्यवसायाच्या विस्तारासाठी ऑनलाइन उपस्थिती महत्वाची असते. उद्योग मित्र आणि एबीएन हे एकत्रित प्रयत्नाने  एमएसएमई व्यवसायांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतील असा आम्हाला विश्वास आहे.

 अविनाश चंद्र म्हणाले, डिजिटल व्यवहारांची क्षमता भारतीय एमएसएमई साठी एक प्राथमिक गरज आहे आणि ही क्षमता मिळवल्यास भारतीय उद्योगांना प्रगतीसाठी कसलीही मर्यादा राहणार नाही.

गोविंद सदामते म्हणाले, मोफत वेबसाइट तयार करून मिळणे आणि इ-कॉमर्स व्यासपीठावरील उपस्थिती ही या व्यवसायांसाठी एक सुवर्णसंधी आहे.यामुळे त्यांच्या व्यवसायाची वाढ कसल्याही परिस्थितीत खंडित होणार नाही. प्रत्येक उद्योगाने या संधीचा लाभ घेतला पाहिजे.

३१ जून पर्यंत नोंदणी करता येणार 

या योजनेची सुरुवात २९ मे पासून सुरू झाली आहे. या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यावसायिकांनी आपले नावदूरध्वनी क्रमांकईमेल इत्यादी गोष्टींच्या तपशीलासह आपली माहिती ८३७८९७६२७२ /  ९३२२ ४२ ९८३१ या व्हाटसअॅप नंबरवर अथवा udyog.abn@gmail .Com या ईमेल वर येत्या ३१ जून २०२१ पर्यंत पाठवून  एमएसएमई कॅम्प मध्ये  सहभागी  व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading