Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

मंडई येथील बेकायदेशीर अतिक्रमण कारवाई विरोधात न्यायायालयात जाणार – सोमनाथ काची

पुणे – पुणे महापालिकेने आज सकाळी सकाळी कोणतीही कल्पना अथवा नोटीस न देता ,स्थानिक व्यवसायिकांना विश्वासात न घेता अतिशय चुकीच्या पद्धतीने मंडई येथील व्यसायिकवर कारवाई करण्यात आली आहे .या घटनेचा आम्ही स्थानिक व्यवसायिक निषेध करीत आहोत .शिवाय लवकरच न्यायालयात दाद मागणार असून याबाबत प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलनही करण्यात येणार आहे.

मंडई येथून भुयारी मेट्रो काम चालू आहे आम्ही वेळोवेळी महापालिका आणि मेट्रो ला सहकार्य करण्यास तयार असल्याचे कळवले होते परंतु आधी आमचे पुनसर्वसन करा अशी आमची मागणी होती .शिवाय मेट्रोच्या आराखड्यानुसार कारवाई करावी. महामेट्रो ,पुणे महानगरपालिका चे आयुक्त, उपायुक्त, मंडई चे अधिकारी तसेच राजकीय नेते व पोलीस प्रशासन चे अधिकारी यांच्या संगन मताने उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर कारवाई केली तसेच करोना नियमाचेही उल्लंघन झाले आहे कोणतीही स्थानिकांची परवानगी न घेता आज ही कारवाई अतिशय चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप अध्यक्ष सोमनाथ आप्पा काची यांनी केला आहे.यासाठी लवकरच मोठा लढा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .या कारवाईचा स्थानिक व्यावसायिक ,मंडई फळ विक्रेता संघ यांनी निषेध केला आहे .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading