fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENTLatest NewsPUNESports

भेटा पुण्यातील अंध सोलो पॅराग्लायडरला हिस्ट्री टीव्ही 18 च्या ‘ओएमजी!यह मेरा इंडिया’मध्ये

पुणे, दि. 29 : काही माणसं असं काही भन्नाट काम करतात की आपण फक्त आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत रहतो. कसं करत असली ते हे? हे जाणून घ्यायचं असेल तर सोमवारी रात्री 8 वाजता फक्त हिस्ट्री टीव्ही 18 वरील ‘ओएमजी! यह  मेरा इंडिया’ चा पुढील एपिसोड पहा. या एपिसोडमध्ये महाराष्ट्रातील दोन अप्रतिम अचिव्हर्स तुमच्या भेटीला येतील आणि तुम्हाला आश्चर्यचकित करतील. भारतीयांमधील अतुलनीय प्रतिभा आणि उत्कृष्ट कामगिरी दाखवणाऱ्या या प्रचंड यशस्वी सीरिजमध्ये मुंबईतील 13 वर्षांचा राहीश खत्री हा भारतातील सर्वात तरुण डेअरडेव्हिल मोटोक्रॉस रेसर आणि पुण्यातील 43 वर्षीय दिव्यांशू गणात्रा या अंध सोलो पॅराग्लायडरची कमाल पाहता येईल.

वंडरकिड राहीशने अगदी सहा वर्षांचा असतानाच रेसचा परवाना मिळाला आणि तो जगातील सर्वात कमी वयाचा ड्रॅग रेसर बनला. हिस्ट्री टीव्ही 18  वर सोमवारी 8 वाजता येणाऱ्या या एपिसोडमध्ये त्याचे वडील मुद्दसर खत्री यांनी आठवण सांगितली आहे की लहानपणी राहिश पहिले शब्द बोलला तेच ‘व्रूम व्रूम’ हे. अर्थातच, त्यानतंर जगभरात विविध ठिकाणी त्याने 30 हून अधिक ट्रॉफी आणि मेडल्स जिंकले. यात एमआरएफ सुपरक्रॉस आणि दुबई डीएमएक्सचाही समावेश आहे. आता तो आणखी भव्य गोष्टी करणार आहे. वॅन-हँडर जम्प्स, फ्रीस्टाईल मोटोक्रॉस, व्हिलीज आणि स्टॉपीज अशा सगळ्यातच एक्स्पर्ट असलेल्या राहीशला खरंतर कशाचेच भय नाही. टाईट टर्न्स, अडथळे आणि स्टीप जम्प्स म्हणजे त्यासाठी अगदी सहज आहेत. राहीशला अनेक ब्रँड्सचे पाठबळ आहे.

अशीच आणखी एक भन्नाट व्यक्ती आहे पुण्यातली. 43 वर्षीय दिव्यांशू गणात्रा यांनी वयाच्या 19 व्या वर्षी दृष्टी गमावली. पण, त्यांच्या मनात एकच विचार होता, “मी पाहू शकत नसलो तर काय झाल? मला उडण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही!” अंध सोलो पॅराग्लायडर म्हणून त्यांनी अनेक आव्हानांवर मात केली आहे. फ्लाइटमध्ये त्यांचे इंस्ट्रक्टर अवि मलिक त्यांना रेडिओच्या माध्यमातून वातावरण आणि हवामानाविषयी माहिती देत असतात आणि दिव्यांशू यांच्याकडे तर उड्डाणाची सगळी थिअरी आणि सराव अगदी तयारच असतोच. माऊंट किलिमांजरोवरील मोहिमेसारख्या अप्रतिम मोहिमा पूर्ण केल्यानंतर आता त्यांनी अॅडव्हेंचर बियॉण्ड बाऊंड्रीज ही ना नफा तत्वावरील संस्था सुरू केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading