लष्कर भागात निराधार जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांसाठी पोलीस व एस.पी.ओ.यांची विशेष मोहीम
पुणे – लष्कर भागातील सोसायाट्यामध्ये एकटे राहणारे जेष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू , औषधे व इतर प्रकारची मदत करता यावी या उद्देशाने लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या संकल्पनेतून विशेष पोलीस अधिकारी (SPO) यांच्या माध्यमातून लष्कर भागातील ४० सोसायट्यांमध्ये जाऊन जेष्ठ नागरिक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या.त्यानुसार गरजवंत निराधार जेष्ठ नागरिक व परगावचे विद्यार्थी यांना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे,तसेच औषधे व इतर वस्तू विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच पोहचविण्यात येणार आहे असे व.पो. निरीक्षक कदम यांनी सांगितले. लष्कर भागातील जेष्ठ नागरिक व विद्यार्थी यांनी लष्कर पोलीस व एस.पी.ओ.यांचे कौतुक केले आहे.
