Saturday, June 20, 2026
BusinessLatest NewsPUNE

कोहिनूर ग्रुपतर्फे ‘पुणे ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन

पुणे, दि. २७ – कोरोना साथीच्या कठीण काळात घर खरेदी करु इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक पाऊल पुढे येत पुण्यातील कोहिनूर ग्रुपने ‘कोहिनूर उत्सव’ या पुण्यातील ऑनलाईन प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन केले आहे. यात शहरातील ८ विविध ठिकाणी होणारे ९ वेगवेगळे प्रकल्प ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. असे हे एकमेवाद्वितीय प्रदर्शन शुक्रवार दि. २८ मे पासून सुरु होणार असून यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.

या एक्स्पोमध्ये शिरगाव येथील अभिमान टाऊनशिप, कोंढव्यातील कोहिनूर रियाना, ताथवडेमधील कोहिनूर सफायर २, हिंजवडी फेज ३ मधील कोहिनूर कोरल, बिबवेवाडीयेथील कोहिनूर जीवा, रावेतमधील कोहिनूर ग्रँड्यूअर आणि सुस येथील कोहिनूर इमरल्ड या प्रकल्पांचा समावेश असणार आहे. याशिवाय हिंजवडी फेज १ मधील मान व बी टी कवडे रस्त्यावरील लवकरच सुरु होणारे प्रकल्पदेखील यात प्रदर्शित होणार आहेत.

ग्राहकांना आपल्या सोयीनुसार फोन, लॅपटॉपवर अनेक प्रकल्प बघायला व काही शंका असल्यास त्याच्या निरसनासाठी तज्ज्ञांशी बोलतादेखील येणार आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असून ग्राहकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन ते करू शकतील व प्रकल्पाची सर्व माहिती देऊ शकतील.
कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले, “या कोहिनूर उत्सवाच्या आयोजनातून आम्ही आमच्या ग्राहकांना आश्वस्थ करत आहोत की, या कठीण काळातही तुमच्या घर खरेदीच्या उर्मीचा आम्ही सन्मान करत आहोत. म्हणूनच या उत्सवात घरबसल्या घर निवडण्याची व बुक करण्याची सुविधा आम्ही ग्राहकांना पुरवत आहोत. ग्राहक त्यांची गरज, आर्थिक क्षमता व ठिकाण यानुसार घर निवडू शकतो व त्यानुसार प्रकल्प बघून त्याची सर्व माहिती मिळवू शकतो.”याशिवाय जे ग्राहक या कोहिनूर उत्सवात सहभागी होतील त्यांना आकर्षक ऑनलाईन ऑफर्सही यावेळी उपलब्ध होणार आहेत. यात तातडीने इ-लोन मंजुरी, हप्ते भरण्याच्या योजनेत लवचिकता, स्टँप ड्युटीवर ५० टक्क्यांची सुट आणि १० ग्रॅम सोने अशा आकर्षक ऑफर्स मिळतील.

कोहिनूर ग्रुप १९८३ पासून कार्यरत असून आजवर ३२ यशस्वी प्रकल्पांद्वारे ६.५ दशलक्ष चौरस फुटाचा रहिवासी भाग घरांच्या रुपात देत सहा हजाराहून अधिक कुटुंबांना त्यांनी आनंद प्रदान केला आहे. त्यांच्या ३७ वर्षांच्या कालावधीत त्यांनी शहरातील विविध ठिकाणी सुमारे १६ वेगवेगळ्या व्यावसायिक प्रकल्पांमध्ये साधारण दोन दशलक्ष चौरस फुट व्यावसायिक प्रकल्प विकसित केले आहेत. सध्या पुण्यात असे अजून १० प्रकल्प सुरु आहेत.

‘सदा सुखी रहो’ (एसएसआर) या आपल्या तत्वज्ञानानुसार रहिवासी, भागीदार व समाज यांच्याशी ग्रुप कायमच बांधिलकी जपते. याद्वारे ग्राहकांना त्रासदायक ठरणाऱ्या बाबी समजून घेत त्यांना वर्षानुवर्षे आनंददायी अनुभूती देण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी २५ जणांची एक स्वतंत्र टीम कार्यरत असते. जे कोहिनूर प्रकल्पांचे हस्तांतरण झाल्यानंतरही अनेक महिने ग्राहकांशी संपर्कात राहून त्यांच्या अडचणींचे निरसन करतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading