Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

कोरोना – राज्यात आज ४६ हजार ७८१ नवीन रुग्ण; ८१६ जणांचा मृत्यू

मुंबई –  राज्यात आज ४६ हजार ७८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. राज्यात आज ५८ हजार ८०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ४६ लाख १९६ इतकी झाली आहे. तर राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८८.०१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातल्या अॅटिव्ह रुग्णांची संख्या आता ५ लाख ४६ हजार १२९ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात एकुण आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०१,००,९५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,२६,७१० (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३६,१३,००० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,४१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज नोंद झालेल्या एकूण ८१६ मृत्यूंपैकी ३८७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३६ मृत्यू, पुणे- ४६, नागपूर- २७, बीड- २२, नाशिक- २१, जालना- १६, नांदेड- ११, भंडारा- १०, अहमदनगर- ९, चंद्रपूर- ८, सोलापूर- ८, ठाणे- ८, औरंगाबाद- ५, रत्नागिरी- ५, वाशिम- ५, कोल्हापूर- ४, लातूर- ४, गोंदिया- ३, हिंगोली- ३, जळगाव- ३, पालघर- ३, सातारा- ३, गडचिरोली- २, उस्मानाबाद- २, परभणी- २, रायगड- २, अकोला- १, धुळे- १, सांगली- १ आणि सिंधुदुर्ग- १ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

पुणे शहर कोरोना अपडेट्स

  • दिवसभरात १९३१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४५६७ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७६ रुग्णांचा मृत्यू. २६ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १३९५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४५२०६४.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २७०१४.
  • एकूण मृत्यू -७५१३.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४१७५३७.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३९८१.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading