मराठा आरक्षण- तातडीने निर्णय घ्या, मुख्यमंत्री ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले होते. राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होते. या निर्णयामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्काच बसला होता. तसेच या निर्णयांच्या निकालानंतर विरोधकांनी आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच या प्रश्नी आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहले असून मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीनं सोडवावा व या समाजातील शिक्षणात १२ टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना विनंती पत्र लिहिले आहे की, मराठा समाजातील बांधवाना त्यांच्या आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला आहे. मात्र तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. राज्याला अशा पढणे कायदा तयार करून आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असे मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करताना न्यायालयानं म्हंटल आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आज केंद्रातील मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून राज्याला मराठा आरक्षण देता येणे शक्य आहे. ते देण्यात यावे आणि त्यासाठी आवश्यक असणारी पावलेही उचलावीत. याचबरोबर मराठा समाजातील मुलांच्या शिक्षणात १२ टक्के आणि सरकारी नोकरीत १३ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी कयोग्य ती कार्यवाही करावी, अशी विंनती यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.
