Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे स्वच्छतादूत आणि पोलिसांना सॅनिटायझर व मास्कचे किट

पुणे, दि. ११  : कर्तव्य दक्षतेने कोविडच्या वातावरणात देखील नागरिकांची काळजी घेण्याकरीता रस्त्यावर उतरुन काम करणा-या फरासखाना व विश्रामबाग पोलीस स्टेशन तसेच मंडई व शुक्रवार पेठ पोलीस चौकीतील पोलीस बंधू-भगिनींना दत्तमंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त सॅनिटायझर, मास्क व सी व्हिटॅमीनच्या गोळ्या असे किट देण्यात आले. तसेच, मंदिर परिसरातील मंडई स्वच्छता कोठीतील स्वच्छतादूतांना देखील हे किट देण्यात आले.

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या (चैत्र अमावस्येला) पुण्यतिथीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम व पुष्पआरास करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक कुंडलीक कायगुडे यांच्या हस्ते स्वच्छता किट देण्यात आले. दरवर्षी मोगरा महोत्सव मोठया प्रमाणात केला जातो. मात्र, यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने पुष्पआरास करण्यात आली.

दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी यावेळी उपस्थित होते. पुण्यतिथीनिमित्ताने इस्कॉन पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन चिकोडे, जनसंपर्क अधिकारी भक्ती भोसले व दत्तमंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष शिरीष मोहिते यांच्या हस्ते माध्यान्य आरती झाली.

सुनिल रुकारी म्हणाले, स्वच्छतादूत आणि पोलीस बांधव नागरिकांचे कोविडपासून संरक्षण करण्याकरीता अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याकरीता आवश्यक सॅनिटायझर, मास्क व सी व्हिटॅमीनच्या गोळ्या ट्रस्टतर्फे देण्यात आले आहेत. सत्तू अमावस्या हा लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचा पुण्यतिथी दिन असतो. त्यामुळे या दिवशी विविधरंगी पुष्परचना करण्यासोबतच हा समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आला. मंदिरामध्ये असलेल्या सेवेक-यांना धान्य व जीवनावश्यक गोष्टींचे किट देण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading