Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

मार्केट यार्ड – तरकारी विभागात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आडत्यांवर कारवाई; ५२ हजार रुपये दंड वसूल

पुणे, दि.१० – कोरोनाच्या परिस्थितीत केलेल्या नियमांचे उल्लंघन करणारे आडते, तसेच डमी आडत्यांवर मार्केट यार्डातील तरकारी विभागात मोठी कारवाई करण्यात आली . सोमवारी (दि.१०) तब्बल ५५ जणांवर कारवाई करून जीएसटीसह ५२ हजार १५३ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. एका दिवसात केलेली ही मोठी कारवाई आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली तरकारी विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांनी ही कारवाई केली.


कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखणे आणि गर्दी कमी करण्यासाठी बाजार समितीने मार्केटयार्डात नियमावली तयार केली आहे. डमी व्यापाऱ्यांवर व्यापार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर, बाजारातील निम्म्या पाकळ्या एक दिवस, दुसऱ्या दिवशी निम्म्या सुरु ठेवण्यात येत आहेत. याशिवाय इतर नियम बनविण्यात आले आहेत. या अनुषंगाने सोमवारी तरकारी विभागात गटप्रमुख डी.बी.वारघडे, डी. जी.थोपटे, एन.जे.राऊत यांनी कारवाई केली. पाकळी बंद असताना व्यापार करणाऱ्या व्यापारी आणि बंदी घातली असताना व्यापार करणाऱ्या डमी व्यापाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.

मार्केटयार्डातील फळ विभागात सोमवारी (दि. १०) करोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करून पाच हजार नऊशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विभागप्रमुख बाबासाहेब बिबवे यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख बाळासाहेब कोंडे यांनी ही कारवाई केली.

करोना संसर्गामुळे केलेल्या नियमाची कठोर अंमलबजावणी केली जाईल. नियम न पाळणाऱ्यावर बाजार समितीच्या वतीने कारवाई करण्यात येईल.

  • दत्तात्रय कळमकर, तरकारी विभागप्रमुख, बाजार समिती

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading