Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दिलासादायक – राज्यात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ४० हजारांपेक्षा कमी

मुंबई –  लॉकडाऊन नंतरही राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस ६० हजारांनी वाढत होता. आज ही आकडेवारी कमी झाली असून गेल्या २४ तासांत ३७ हजार ३२६ नवे रुग्ण सापडले असून ६१ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा ४०  हजारांच्या खाली आला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४४  लाख ६९ हजार ४२५  कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.97 टक्के झाले आहे. आज राज्यात ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर आज ५४९  कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.४९  टक्के एवढा आहे.

आज मुंबईत 1,794 रुग्णांचे निदान झाले तर 3,580 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात 1165 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत तर एकाच दिवशी 4010 जण बरे होऊन घरी गेले आहेत. नागपूर जिल्ह्यात आज 2530 कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. (नागपूर शहर 1371, नागपूर ग्रामीण 1149). जिल्ह्यात आज कोरोनामुळे 51 मृत्यू झाले. तर आज 6,068 कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात काल रविवारी 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले होते तर राज्यभरात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. तर परवा म्हणजे शनिवारी 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.

पुणे शहर अपडेट

  • दिवसभरात ११६५ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ४०१० रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात करोनाबाधीत ७४ रुग्णांचा मृत्यू. २३ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • १४०२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४४७७२९.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०८३६.
  • एकूण मृत्यू -७४०९.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४०९४८४.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११४९९.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading