महामारीच्या विरोधात सुरू असलेल्या भारताच्या लढ्यात व्हीएलसीसीने सुरू केला प्रभावशाली पोस्ट-कोव्हिड रिकव्हरी कार्यक्रम
पुणे – नेहमीच काळाच्या पुढे जाऊन विचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हीएलसीसीने आज आपल्या व्हीकेअर नावाच्या इंटेन्सिव्ह रिस्टोअरेटिव्ह स्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ केला. कोव्हिड-१९ विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाल्यानंतर या आजाराच्या शरीरावर राहून जाणा-या परिणामांवर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करत हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. संसर्गमुक्त झाल्यानंतरच्या आठवड्यांमध्ये आणि महिन्यांमध्ये रुग्णांना व्यवस्थित फॉलो-अप देखभाल मिळावी या विशिष्ट हेतूने बनविण्यात आलेला हा व्हीकेअर कार्यक्रम शरीर आणि मन, दोहोंनाही अधिक आरोग्यपूर्ण पद्धतीने पूर्ववत करण्यास मदत करतो. हा कार्यक्रम www.vlccwellness.com येथे ऑनलाइन आणि व्हीएलसीसीच्या भारतभरातील वेलनेस क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहे.
कोव्हिड-१९ आजारातून ब-या झालेल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या रोगमुक्त झाल्यानंतर व विषाणूमुक्त झाल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत त्रासदायक लक्षणे जाणवत असल्याचे पाहण्यांमधून दिसून आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, यूएसएने ही अलीकडेच या स्थितीची दखल घेतली असून तिला पोस्ट अक्युट सिक्वेल ऑफ सार्स-कोव्ह-२ इन्फेक्शन (पीएएससी) असे नावही दिले आहे. कोव्हिड बरा झाल्यानंतरच्या या लक्षणांमध्ये अतिरिक्त थकवा, झोप न येणे, भूक न लागणे, शरीराला झालेल्या कष्टांमुळे येत राहणारा बारीक ताप, धाप लागणे, कोरडा कफ, पूर्ण बरा न होणारा ब्राँकायटिस, सांध्यांमध्ये वेदना, दुखरे स्नायू, विचार करायला आणि मन एकाग्र करायला त्रास होणे (ब्रेन फॉग) तसेच नैराश्य आणि चिंता या समस्यांचा समावेश आहे. या लक्षणांकडे प्रदीर्घ काळासाठी दुर्लक्ष झाल्यास त्यातून वैद्यकीय गुंतागुंती उद्भवू शकतात.
कोव्हिड होऊन गेल्यानंतर रुग्णाच्या देखभालीच्या महत्त्वाविषयी बोलताना व्हीएलसीसी ग्रुपच्या संस्थापक आणि को-चेअरपर्सन वंदना लुथरा म्हणाल्या, देशातील रोगनिवारक वैद्यकीय परिसंस्था ही संपूर्णपणे कोव्हिड-१९ महामारीशी झुंजण्यावर आपले लक्ष केंद्रित करून आहे आणि ते योग्यही आहे, तरीही संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांचे आरोग्य संपूर्णपणे पूर्ववत व्हायला हवे असेल तर त्यांना सातत्याने मार्गदर्शन मिळत राहणेही महत्त्वाचे आहे. या समस्येशी सुरू असलेल्या लढ्यामध्ये आपले परिणामकारक योगदान देण्यासाठी व्हीएलसीसी आपले चिकित्सात्मक स्वास्थ्यसेवेच्या क्षेत्रातील आपले सखोल ज्ञान घेऊन मदतीसाठी पुढे आले आहे. या महामारीला दूर करण्याच्या प्रयत्नांमध्ये केवळ रुग्णांचे चांगले आरोग्य पूर्ववत करण्यासाठीच नव्हे तर भारताच्या आरोग्यसुविधा पुरविणा-या यंत्रणेवरील काही भार दूर करण्याच्या काही पोस्ट-कोव्हिड-१९ रिकव्हरी प्रोग्राम्सची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
व्हीएलसीसी ही एकमेव अशी संस्था आहे, जिच्या वेलनेस प्रोग्राम्सना रेकमेंडेड बाय इंडियन मेडिकल असोसिएशन चा स्टॅम्प मिळाला आहे.
मेडिकल डॉक्टर्स, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपीस्ट्स आणि मानसोपचारतज्ज्ञांचा समावेश असलेल्या व्हीएलसीसीच्या संशोधन आणि विकास पथकाने कोव्हिड-१९ महामारीशी सुरू असलेल्या लढ्यामध्ये पहिल्या फळीत काम करणा-या विशेषज्ज्ञ आणि विषयतज्ज्ञांच्या सल्ल्याने व्हीकेअरपोस्ट कोव्हिड-१९ रिकव्हरी प्रोग्राम विकसित केला आहे.
