कोर्टाच्या अपेक्षेनुसार ‘कडक लॅाकडाऊन’ ची पुण्यात गरज नाही – गोपाळदादा तिवारी
कोरोना बाबत’ पुणेकर गंभीर नसल्याचे वकिलांचे न्यायालयापुढे चुकीचे कथन…!
पुणे – “पुणे शहरातील लोक मास्क वापरत नाहीत, कोविड विषयक गाईड लाईन्स पाळत नाहीत, सोशल डीस्टसिंग पाळत नाहीत” इ इ चुकीचे आरोप नुकतेच काल, मुंबई ऊच्च न्यायालयात राज्याच्या जेष्ठ विधीज्ञांनी केले, हे सखेद आश्चर्य असून, ‘पुणेकरां विषयी चुकीची माहीती’ न्यायालयात सादर करू नये.. असे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दीलेल्या निवेदनात केले आहे..!
काल मुंबई ऊच्च न्यायालयात ‘पुणे शहर व पुणेकर नागरीकां विषयी’ राज्याच्या जेष्ठ विधीज्ञांनी पुणेकर कोविड संसर्ग काळात अपेक्षीत वर्तन करत नसल्याचे सांगून कोर्टाची दीशाभूल करायचा प्रयत्न झाला आहे.. त्या चुकीच्या आरोप – वक्तव्यांमुळेच मे ऊच्च न्यायालयाने पुणे शहरांत अधिक कडक व सक्तीचा लॅाकडाऊन लावणे बाबत विचारणा करणारे भाष्य केले.. त्यामुळे पुणेकरां मध्ये रोजदांरीवर अवलंबून असणार्यांमध्ये, चाकरमान्यांमध्ये नाहक भितीचे ऐवजी धास्तीचे वातावरण पसरले आहे.. वास्तवता पाहता पुणेकर नागरीक, रोजंदार, कामगार, पथारी वाले, कष्टकरी, कामगार व व्यापारी’ हे ऊत्स्फूर्तेने नियमांचे पालन करीत शिस्त पाळत आहेत.. रस्त्यावर अनावश्यक कोणी फीरत नाही.. संयम व शिस्तीचे पालन करण्यामुळेच् गेल्या १८/२० दिवसांतील ‘ॲक्टीव्ह कोरोना रूग्ण संख्या’ सरासरी रोज १,००० ने कमी झाल्याचे पहायला मिळते आहे..!
राज्यात पुणे शहर – परिसर महत्वाचे अर्थ चक्र’ असून, अगोदरच नुकसान सोसत असलेल्या पुणेकरांवर ‘कडक लॅाकडाऊन’ चा हातोडा न्यायालयाने देखील ऊगारू नयें… न्यायालयास निर्देश द्यायचेच असतील तर मनपा, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त प्रशासनास कोरोना प्रतिबंधक प्रशासकीय आवश्यक पावले ऊचलणे विषयी द्यावेत…’कोरोना रूग्णांसाठी’ असलेल्या (सरकारी-खाजगी हॅास्पीटल चे सु ११,५०० ॲाक्सीजन, आयसीयू, व्हेंटीलेटर्स सह) बेड्स ची ऊपलब्धता व वाटप साठीचा अद्यावत ‘रीयल टाईम डॅश बोर्ड’ अपडेट करणे बाबत व तो कार्यान्वित करणे बाबत मे न्यायालयाने आदेश द्यावेत.. असे जाहीर आवाहन देखील मेहेरबान न्यायालयास करीत असल्याचे, गोपाळदादा तिवारी यांनी म्हंटले आहे..!
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी पर्यायाने रूग्णांना तातडीने बेड ऊपलब्ध करून देणेसाठीच् Real_Time_Dash_Board ‘आय टी हब’ असलेल्या पुणे शहरात का कार्यान्वीत होत नाही..? हा प्रश्न आता न्यायालयानेच प्रशासनास विचारावा* परंतू अधिक कडक लॅाकडाऊन करून पुणेकरांवरच् अधिक निर्बंध टाकू नयेत.. सुचना व आदेश द्यायचेच असतील तर ते जरूर प्रशासनास द्यावेत.. असे देखील गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले .
