अवाडा फाउंडेशन महाराष्ट्र आणि राजस्थान मध्ये ३०० बेड्ससह ४ हॉस्पिटल आणि २ ऑक्सिजन प्लांट उभारणार
पुणे:- कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील परिस्थिती अत्यंत गंभीर व भयंकर झाली असून लोक दवाखान्यात बेड, औषधी आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी देखील संघर्ष करत आहे विशेषकरून आपल्या समाजातील निम्न वर्गावर याचा अधिक परिणाम झाला आहे.अशातच अवाडा फाउंडेशन वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यासाठी निरंतर कार्य करीत आहे ज्यामध्ये वेंटीलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन काँसेंट्रेटर्स आणि खाद्य पदार्थ यांचा समावेश आहे. परंतु या कठीण परिस्थिती मदत करून अधिक योगदान देण्यासाठी अवाडा फाउंडेशन महाराष्ट्र आणि राजस्थानमधील विभिन्न ठिकाणी २-ऑक्सिजन प्लांट्स, वेंटीलेटर (BiPAP , ऑक्सिजन काँसेंट्रेटर्स, आणि ३०० बेड्स सह ४ हॉस्पिटल सुरु करण्याची योजना करीत आहे.
अवाडा फाउंडेशन, अवाडा ग्रुप ऑफ कंपनीज एक परोपकारी भाग असून सतत समाजाच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविण्यात सक्रिय असते, ज्यामध्ये बाल शिक्षण,ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा, कौशल्य विकास,महिला सशक्तीकरण इत्यादींवर विशेष लक्ष दिले जाते. ‘प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या आई-वडिलांचे ऋणी असायला हवे जे त्यांचे पालन-पोषण करून त्यांना मोठे करतात’ अवाडा फाउंडेशनचा या भारतीय सिद्धांतावर दृढ विश्वास आहे. आपल्यावर समाज-संस्कृती तसेच देवता आणि ऋषींचे देखील ऋण असून मोठ्या प्रमाणात निसर्गाचे देखील आपल्यावर उपकार आहेत आणि त्यांचे हे ऋण कसे फेडायचे हे आपल्या आयुष्याचे ध्येय असायला पाहिजे. आणि चांगल्या कर्मासह आपण हे ऋण फेडू शकतो आणि निर्वाण प्राप्त करू शकतो. वर्तमान काळातील कठीण परिस्थितीमध्ये आपण सेवा करत असलेल्या समाजासाठी तसेच लोकांसाठी आपले उद्देश आणि मूल्ये अत्यंत महत्वाची आहेत, आणि निस्वार्थपणे त्यांची सेवा करण्यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे.
संपूर्ण भारतभर कोविड-१९ चे प्रकरणे झपाट्याने वाढत असून कमकुवत वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि गंभीर रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक मानवी भांडवलाची कमतरता यामुळे याचा ग्रामीण भागावर अधिक परिणाम झाला आहे. आणि म्हणूनच रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी कोविड-१९ ने संक्रमित रुग्णाला त्यांच्या आजाराच्या सुरुवातीलाच ओळखणे आवश्यक आहे जेणेकरून आधीच दबावात असलेल्या वैद्यकीय यंत्रणेवरील भार कमी करता येईल.
आजाराचा पुढील संसर्ग टाळण्यासाठी कोरोना संक्रमित रुग्णांना विलगीकरणात ठेवणे देखील आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या ८५% रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्याची गरज नसते व त्यांचा घरीच उपचार केला जाऊ शकतो. तथापि, छोट्या छोट्या गावात रूग्णांना विलगीकरणात ठेवणे एक आवाहनच आहे कारण तिथे फक्त रुग्णाला वापरता येईल असे समर्पित वॉशरूम/शौचालये यांची सुविधा नाही आहे.
आणि म्हणूनच परिस्थितीची वास्तविकता लक्षात घेत अवाडा फाउंडेशन ने अशा भागात समर्पित हॉस्पिटल आणि विलगीकरणासाठी बेड्स प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.अवाडा फाउंडेशन हे जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी सुसंगत आहे आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांना पाठिंबा देत आहे. या प्रकल्पांतर्गत विस्तृत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अवाडा सीआयआय फाऊंडेशनबरोबर देखील जवळून काम करत आहे. सीआयआयचे सदस्यदेखील या योजनेत त्यांचे योगदान देतील.
