सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला – ॲड. गुणरत्न सदावर्ते
मुंबई – मराठा समाजाच्या गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेली मराठा समाज सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय आहे, अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगून 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेलं हे आरक्षण अवैध असल्याचं सांगितलं. या सर्व प्रकरणात आरक्षण विरोधी याचिका दाखल केलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आनंद व्यक्त करत निर्णयाचं स्वागत केलं आहे. यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘भारतीय संविधान आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज गुणवंतांना न्याय दिला’.
अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मी आनंदाने या निकालाचे स्वागत करतो. “महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंतांनी, ज्या प्रकारे माझं, माझ्या कुटुंबाचं समर्थन केलं. माझ्यामागे शक्ती म्हणून उभे राहिले. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो”
“मराठा समाजाचे ५२ मार्चे झाले. त्यासाठी BMW मधुन गर्दी जमवली. देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणला” असा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला. “ही खुल्या गणुवंतांची संविधानासोबतची लढाई होती. सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्हायरसप्रमाणे मराठा आरक्षणाला अल्ट्रा व्हायरस घोषित केले” असे विधान गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.
“गायकवाड समितीचा अहवाल रद्द केला. इंद्रा सहानी खटला सात न्यायमुर्तींच्या घटनापीठाकडे पाठण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मराठा आरक्षण मागास ठरत नाही” असे सर्वोच्च न्यायालयाने डंके की चोट पर सांगितल्याचा दावा गुणरत्ने सदावर्ते यांनी केला. तसेच मराठा आरक्षणाची तुलना गुणरत्न सदावर्ते यांनी वायरसशी करून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण हा अल्ट्रा व्हायरस आहे, असं म्हटलं असल्याचं सांगितलं.
