अभिनेत्री दीपिका पादुकोणसह कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बॉलिवूडचे अनेक सितारे पॉझिटिव्ह झाले आहेत. आता सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर दीपिकाची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दीपिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मागील महिन्यात रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बंगळुरूला गेले होते. दीपिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येण्यापूर्वी तिच्या कुटुंबाला लागण झाली. तिच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी आली होती. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना बंगळुरुतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे दीपिकाच्या आई उज्ज्वला पादुकोण आणि बहीण अनिषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर आता दीपिकाही कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे तिचे पूर्ण कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: