Wednesday, June 17, 2026
PUNETOP NEWS

मध्यरात्री दुहेरी खुनाने पुणे हादरले – तडीपार गुंडाने केला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा खून; वेश्यावस्तीतील महिलेचाही खून

पुणे – पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कडक लॉकडाऊन सुरू आहे तर दुसरीकडे गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री दोन खून झाल्याचे उघडकीस आले आहे. तडीपार असलेल्या गुंड प्रवीण महाजनने फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद यांचा खून केला आहे. पोलिसांनी महाजनला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजवळ मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.सहाय्यक उपनिरीक्षक समीर सय्यद (वय 48) हे बंदोबस्त आटोपून घरी चालले होते. सय्यद हे खडक पोलीस लाईनमध्ये राहायला होते. सय्यद हे श्रीकृष्ण टॉकीजवळ पोहोचले असता प्रवीण महाजनने त्यांचा खून केला. नेमका हा खून का आणि कशासाठी केला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे. सय्यद यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

प्रवीण महाजन हा एक वर्षासाठी तडीपार आहे. त्याच्या वरती अनेक गुन्हे दाखल आहेत. सय्यद आणि महाजन यांच्या मध्ये काही वाद होता का किंवा हत्येचे कारण काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. महाजन तडीपार असून हत्यार सोबत घेऊन शहराच्या मध्यवस्तीत आला तोपर्यंत पोलीस काय करत होते असा प्रश्न आहे.

पोलीस या घटनेचा तपास करत असताना घटनास्थळावरून काही अंतरावर दूर असलेल्या बुधवार पेठेत एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा राणी ( वय 24) खून करण्यात आल्याची घटना घडली. पहिल्या घटनास्थळापासून अवघ्या 50 मिटर अंतरावर ही घटना घडली. नेमका खून का आणि कशासाठी करण्यात आला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. मात्र, रात्रीची संचारबंदी असताना दोन खून घडल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading