“कू” ने भारतीय भाषांकरिता लाँच केले ‘टॉक टू टाइप’ फीचर

कू ने ”टॉक टू टाइप”(बोलून टाईप करणे) ह्या जादूमय फीचरच्या लाँच ची घोषणा केली आहे.  आता कुणालाही ज्यांचे विचार व्यक्त करायचे आहेत त्यांना आता टाइप न करता खूप सहजपणे व्यक्त करता येतील. तुमचे जी ही विचार असतील ते विचार मोठ्याने बोलू शकतात आणि शब्द आपोआप जादूने स्क्रीनवर दिसतील आणि ते ही फक्त बटणावर क्लिक केल्यावर आणि कीबोर्ड न वापरता. सध्या कू च्या सर्व भारतीय भाषांमध्ये हे फिचर असणार आहे. मातृभाषेमध्ये भारतीयांना आपले विचार शेअर करण्याचे सर्वांत सोपं माध्यम आहे.

कू हे जगातील पहिले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही “टॉक टू टाइप” हे फिचर देत आहे. हे लाखो कू वापरकर्त्यांसाठी सर्वात सोप्या मार्गाने आपल्या मातृभाषेतून  लिखाण निर्मितीला प्रोत्साहन देणार आहे. बऱ्याच युजरला प्रादेशिक भाषेतले कीबोर्ड वापरायला अडचण येते तेव्हा ह्या फीचरमधून फक्त बोलायचं आहे त्यानंतर शब्द टाईप होऊन तुम्हाला व्यक्त होता येईल.

अप्रमेय राधाकृष्ण, सह-संस्थापक-कू  म्हणाले की, ‘’टॉक टू टाइप” फिचर जादूई आहे आणि प्रादेशिक भाषेमध्ये लिहणाऱ्यांसाठी खूप क्रांतिकारी आणि सोपं असणार आहे. आता युजरला यापुढे कीबोर्ड वापरण्याची आवश्यकता नाही म्हणजे त्यांना फक्त बोलून आपले विचार टाईप करायचे आहेत. भारतीय प्रादेशिक बोलणारे आता त्यांच्या मनातले बोलतील आणि ते शब्द स्क्रीन वर आपोआप टाईप होतील.

मयंक बिडवाटका, सह-संस्थापक-कूम्हणाले की, “कू द्वारे आमचे ध्येय म्हणजे भारताला कनेक्ट करणे आणि अब्जावधी भारतीयांना त्यांच्या मातृभाषेतून मुक्तपणे व्यक्त होण्यास कार्यक्षम करणे. ज्यांना आपल्या फॉलोवर्स सोबत जुळून राहायचं आहे त्यांच्यासाठीव्यक्त होणं सोपं करत राहू.  आम्हाला “टॉक टू टाइप” फिचर लॉन्च करण्यासाठी खूप उत्सुकता आहे जे लोकांना टाइप न करता कू तयार करण्यास सक्षम करते. आता त्यांना फक्त एका बटनावर क्लिक करून त्यांच्या फोनमध्ये बोलायचे आहे त्यानंतर शब्द जादूने स्क्रीनवर दिसतील. ह्यापेक्षा सोपे काहीच असू शकत नाही! असे फिचर असणारे कू हे जगातले पहिले सोशल मीडिया व्यासपीठ आहे..”

Leave a Reply

%d bloggers like this: