माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला – अदर पुनावाला यांनी ट्विट करून स्पष्टीकरण

नवी दिल्ली – केंद्र सरकारने पीआयबीमार्फत लसींच्या पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याबाबत अखेर अदर पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुनावाला यांनी एक पत्र ट्विट केलं आहे.

माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्यामुळे मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. सर्व प्रथम, लस उत्पादन ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे रात्रीतून उत्पादन वाढविणे शक्य नाही, असं अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याला हे देखील समजून घेण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी पुरेसे डोस तयार करणं हे सोपं काम नाही, असंही पुनावाला म्हणाले.

पुढील काही महिन्यांत राज्य आणि खासगी रुग्णालयांसाठी आणखी 11 कोटी डोस पुरवल्या जातील. आम्हाला हे समजते की प्रत्येकाला लस लवकरात लवकर उपलब्ध व्हावी असे वाटते. तेही आमचे प्रयत्न आहेत आणि ते मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असंही पुनावाला यांनी सांगितलं.

आम्हाला आतापर्यंत 26 कोटी डोसची ऑर्डर मिळाली असून त्यापैकी 15 कोटीहून अधिक डोस पुरवण्यात आले आहेत. भारत सरकारकडून पुढील काही महिन्यात 11 कोटी डोससाठी 1,732.50 कोटी रुपयांची 100 टक्के आगाऊ रक्कमही मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 11 कोटी डोस राज्य आणि खासगी रुग्णांलयात पुरवण्यात येतील, अशी माहिती पूनावाला यांनी दिलीये.

Leave a Reply

%d bloggers like this: