फर्जंद, फत्तेशिकस्तमधील अभिनेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई, दि. 3 – कोरोनाच्या दुसऱ्या महामारीने अनेकांचा बळी घेतला आहे. कोरोनाने अनेक नेते, उद्योजक, अभिनेेत्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा कालाकार नवनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

नवानाथ यांचा रूग्णालयात उपचार घेतानाच मृत्यू झाला. याबाबत  चित्रपट लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्तमध्ये काम केलेल्या नवनाथ गायकवाड या एका अत्यंत गुणी आणि मेहनती कलाकाराचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना, असं दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नवनाथ हे ऐतिहासिक चित्रपटांमध्ये मावळ्यांची भूमिका साकारत होते. नवनाथ यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी फत्तेशिकस्त आणि फर्जेद चित्रपटाचे संकलन करणारे प्रमोद परिहार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

Leave a Reply

%d bloggers like this: