भारती विद्यापीठ आयएमईडी आयोजित ‘सी -गुगली :टेक्निकल कॉम्पिटिशन’ चे उदघाटन 

पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) आयोजित ‘सी -गुगली 2021:इंटर कॉलेजिएट टेक्निकल कॉम्पिटिशन’ चे आयोजन ३ आणि ४ मे  रोजी करण्यात आले आहे. कोड ब्ल्यू (फुजी फिल्म )च्या वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक  मोनिका किलम यांच्या हस्ते या ऑनलाईन कॉम्पिटिशनचे उदघाटन करण्यात आले.

भारती विद्यापीठ आयएमईडीचे संचालक  डॉ. सचिन वेर्णेकर हे उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या स्पर्धांमध्ये ५ तांत्रिक प्रकारांचा समावेश होता. देशभरातून २० महाविद्यालयातून १५० विद्यार्थी सहभागी झाले.एमसीए विभागाचे प्रभारी संचालक डॉ अजित मोरे,डॉ स्वाती देसाई,डॉ निलेश महाजन, डॉ. आर व्ही महाडिक, डॉ प्रमोद कदम यांनी संयोजन केले .  

Leave a Reply

%d bloggers like this: